संस्थेचे उपक्रम  – 2) वानप्रस्थ योजना

शिवराम सीतामाई भक्तीधाम चिंचेवाडी सामानगड ता गडहिंग्लज जि. कोल्हापूर या सेवाभावी संस्थेमार्फत वानप्रस्थ आश्रम सुरू केला आहे.

उद्देश असा की,

पूर्वी चार आश्रम व्यवस्था होती

१) पहिली पंचवीस वर्ष ब्रम्हचर्य आश्रम :  ब्रह्मचर्य पाळून गुरुकुलात राहून शिक्षण घेणे

२) दुसरी पंचवीस वर्षे गृहस्थाश्रम : गृहस्थाश्रमात लग्न संसार करून उद्योग व्यवसाय करून अर्थार्जन करणे व कुटुंबाचे पालनपोषण करणे.

३) तिसरी पंचवीस वर्षे वानप्रस्थाश्रम : संसाराचा त्याग करून सर्वसंगपरित्याग करून आपण कोण आहोत (who am I ?), कोठे जायचे आहे याचा विचार करून, वाचन, चिंतन, मनन याद्वारे मानवी जीवनाचे अंतिम उद्दिष्ट शोधणे.

४) चौथी पंचवीस वर्ष किंवा उर्वरित काळ संन्यासाश्रम:  उद्दिष्ट शोधल्यानंतर त्याचा अंमल करून, सर्व संकल्प-विकल्पाचा त्याग करून निसर्गनियमानुसार पक्षाप्रमाणे जे मिळेल त्यावर गुजराण करून, उभा राहा निवांत या उक्तीप्रमाणे उर्वरित काळ घालवणे

आजकाल आश्रम व्यवस्था मोडीत निघाल्या मुळे पन्नास वर्षाच्या पुढे साठ वर्षे होऊनही सेवानिवृत्ती होऊनही आपण कुटुंबातच राहतो.  त्यामुळे कुटुंब व्यवस्थेवर बोजा होऊन राहतो. मुलांना आज सेवानिवृत्त आई-वडील नकोसे झालेले आहेत, हि काळाची पावले न ओळखता कुटुंबात नकोसे होऊनही आपण बळेच चिटकून राहतो. त्याचबरोबर मोठे नुकसान असे की आपण आपलेही समाधान घालून घेतो व मुलांचेही समाधान घालवतो. त्याचबरोबर मानवी उद्दिष्ट शोधण्याचे म्हणजे मी कोण आहे (who am I ?), आलो कोठून, जायचे कोठे हे काम तसेच राहून जाते व पुढील जन्माला हकनाक पात्र बनतो.  पुन्हा सर्व कटकटी पुन्हा पुन्हा भोगत राहतो. हे जर थांबवायचे असेल तर वानप्रस्थ आश्रमाशिवाय पर्याय नाही.

म्हणून आम्ही वानप्रस्थ आश्रमाची सोय केली आहे. त्याठिकाणी ताणतणाव रहित मुक्त जीवन जगा. थोडा आहार-विहार, थोडे साधन, थोडे वाचन, थोडे चिंतन, थोडे मनन, थोडावेळ प्राणायाम, थोडावेळ आसन म्हणजेच अष्टांगयोग समजून घेऊन यम , नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान, समाधी याद्वारे जीवन धन्य करून घेता येते. याबद्दल संस्थाचालक श्री. के. टी. शेलार यांनी स्वतः प्रयोग करून सिद्ध केले आहे.  जे आपणाशी ठावे ते दुसऱ्यांना वाटावे या न्यायाने या ठिकाणी निसर्गाच्या दिव्य सानिध्यात आणि पवित्र पावन ओम भूमीत वानप्रस्थाश्रमाची सोय केली आहे.

एक वेळ अवश्य विनामूल्य भेट देऊन राहून अनुभव करून समजावून घेऊ शकता व यासाठी एक वेळ जरूर भेट द्या.

 

संपर्क