• संस्थेचे उपक्रम  – 1) साधक सिद्ध योजना

शिवराम सीतामाई भक्तिधाम चिंचेवाडी, सामानगड ता. गडहिंग्लज जि. कोल्हापूर या संस्थेमार्फत साधक सिद्ध योजना सुरू केली आहे.

उद्देश असा की,

किल्ले सामानगड ज्या डोंगरावर आहे तो भीमसासगिरी डोंगर सृष्टी निर्मित ओम आकाराचा आहे.  त्रेतायुगात त्या ठिकाणी संपूर्ण ओमरुपी डोंगरावरील पठार डीमार्केट केले आहे. ओंकाराच्या कडेकडेने वीस ते पंचवीस गुहा मिळालेल्या आहेत.  त्याचबरोबर ओंकाराच्या मकारामध्ये एक त्रेतायुगीन जमिनीखालील वाडा (शिवालय) मिळालेले आहे. त्याचा शोध 2 नोव्हेंबर 1998 रोजी घेण्यात आला आहे.

अशा दिव्य पवित्र भूमीत प्राचीन भारतीय संस्कृतीचे पुनर्जीवन होण्याचा योग आलेला आहे

त्या ठिकाणी ज्यांना प्राचीन सनातन संस्कृतीचा अभ्यास, संशोधन याद्वारे साधना करत सिद्ध बनायचे आहे किंवा जे सिद्ध आहेत त्यांना उर्वरित काळ दिव्य वातावरणात घालवायचा असेल ते या ठिकाणी येऊन पुढील काळात व्यतीत करू शकतात.  या ठिकाणी साधकांना त्यांच्या त्यांच्या टप्याप्रमाने मार्गदर्शन करून पुढील प्रगतीस साहाय्य केले जाईल. सिद्धांकडूनया प्राचीन भारतीय संस्कृतीचे पुनरुज्जीवन करण्यासाठी सहाय्य घेतले जाईल.

या ठिकाणी राहण्याची, मुक्त आहारविहाराची, सत्संगाची सोय केली आहे.  जे ब्रह्मचारी, सन्यासी आहेत त्यांना सर्व सुविधा मोफत पुरवण्यात येतील व ते कितीहि  दिवस राहू शकतात. ज्यांना उत्पन्नाचे साधन आहे त्यांनी स्वतःसाठी व इतरांसाठी थोडा धनाचा त्याग करून वरील सर्व सुविधा प्राप्त करावयाचे आहेत

एक वेळेस संस्थेच्या आश्रमास भेट देऊन अवश्य अनुभव करू शकता.

संपर्क