संस्थेचे उपक्रम – 3) कमवा शिका योजना
शिवराम सीतामाई चिंचेवाडी सामानगड, ता.गडहिंग्लज, जि.कोल्हापूर या सेवाभावी संस्थे मार्फत कमवा शिका योजना सुरु केली आहे.
उद्देश असा की,
कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा चंदगड सारख्या दुर्गम भागात राहणार्या मुलांना उच्च शिक्षणासाठी किमान तालुक्याच्या ठिकाणी जाण्यासाठी बसेसची सोय नसते. परिस्थितीमुळे तालुक्याच्या ठिकाणी राहणे जेवणखाण परवडणारे नसते. अशी मुले नाईलाजाने पुढील शिक्षण अर्धवट सोडून शैक्षणिक बुद्धिमत्ता असूनही मुंबईसारख्या ठिकाणी जाऊन हॉटेलमध्ये वेटर मजूर म्हणून काम करतात.
अशा मुलांना शिक्षणापासून वंचित रहावे लागू नये म्हणून संस्थेमार्फत कमवा शिका योजना सुरू केली आहे. अशा मुलांची शिक्षणाची सोय करून त्यांना संस्थेच्या आश्रमात राहण्याची सोय करून त्यांना येण्या-जाण्यासाठी बस पास देऊन राहण्याची व जेवण्याची सोय करणे. त्यांना योग, प्राणायाम देणे, त्यांचा व्यक्तिमत्व विकास करून घेणे. त्यांचे त्यांचे धर्माप्रमाणे संस्कार देणे. त्या मोबदल्यात प्लांटेशन करणे, झाडांना पाणी देणे आश्रमाची, शेती करणे व लगतच्या शासनाचे वन क्षेत्रातील रोपांचे संवर्धन करणे इत्यादी संपर्क